History

प्राचीन भारताच्या जंगल प्रदेशात अनेक छोटे-छोटे राज्य होते. इंग्रजांनी मध्य प्रांत म्हणून आजचे छत्तीसगढ, मध्य प्रदेश व विदर्भाचा समावेश केला. या राज्यात इंग्रजांची सत्ता येण्यापूर्वी बस्तर नावाचे स्वतंत्र राज्य होते. या राज्यातील बहुतांश लोक हलबा गोंड आदिवासी होते. हलबा आदिवासी मुख्य रस्त्यावरील गावाचे रहिवासी होते. सन १९०१ च्याजनगण नेप्रमाणे बस्तर राज्यात २५२५ गावे होती. या राज्यात हलबा जमातीचा प्रभाव होता. राज्यामध्ये हलबा हे सैनिक होते व राजकारभारात सहभागी होते. राज सिंहासनावर राजा म्हणून स्थापित करण्याचे हलबा नागरिक महत्वाची भूमिका बजावत होते. त्या राजासाठी आपल्या जीवाची बाजी लावत असत. अश्या या राज्याची व त्याचे नागरिक असलेल्या हलबाची हि सत्यकथा आहे.

सन १७४१ मध्ये मराठ्यांनी छत्तीसगढ वर हल्ला करून हैहय वंशाची शक्ती नष्ट केली. सन १९७५ मध्ये विजयानंतर रतनपूरचा राजा रघुनाथसिंग यांची राजगादी हिरावून छत्तीसगढ मराठ्यांचा कब्जात आला. सन १९५८ मध्ये भिमजी भोसले यांचे शासन आले. या मराठा शासनकाळात अशांती व कुप्रशासन होते. मराठा सेनेकडून सतत लूट करण्यात येत होती. मराठा अधिकारी उघडपणे इंग्रजांना अधिकार सोपवीत होते. त्यामुळे स्थानिक लोकांनी मराठा शासनाचा विरोध सुरु केला.

इंग्रजांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर प्रशासनिक व महसूल पद्धतीत बदल घडविल्याने छत्तीसगढच्या लोकांवर विपरीत परिणाम झाला. इंग्रजांच्या घुसखोरीचा बस्तार्मध्ये आदिवासी आणि हलबा कडून जोरदार विरोध झाला. हा विरोध सतत पाच वर्ष म्हणजे सन १७७४ ते १७७९ पर्यंत सुरु होता. हलबाची क्रांती बस्तरच्या इतिहासमधील महत्वाची घटना आहे. या हलबाच्या क्रांतीमुळे चालुक्य वंशाचे राज्य नष्ट झाले. यामुळे येथे मराठा व नंतर इंग्रजांची सत्ता आली. बस्तरच्या डोंगर मध्ये वेगळे राज्य स्थापन करण्यासाठी सन १७७४ च्या हलबा क्रांती ला राजा अजमेर सिंह यांचे पाठबळ होते. अजमेर सिंह ला हलबा जमातीचे आणि हलबा सैनिकांचे समर्थन होते.

या हलबा क्रांती मागचे मुल कारण आर्थिक होते. या भागात अकाल व अल्प शेतजमीन यामुळे लोक त्रस्त होते. बस्तरमध्ये मराठा सैन्यांची उपस्थिती आणि इंग्रजांची इस्त इंडिया कंपनीच्या दहशतीमुळे हलबा क्रांतीची सुरवात झाली. हलबा सैनिकांच्या पराभवानंतर हलबा आदिवासींचा ऐतिहासिक नरसंहार करण्यात आला. परंतु या क्रांतीमुळे चालुक्य वंश नष्ट होवून बस्तर चा इतिहास कायमचा पलटला.
राजपाल देव राजाच्या दोन राण्या बघेलीन व चन्देलीन होत्या. पहिल्या राणीपासून दखन सिंग आणि दुसऱ्या राणीपासून दलपत देव आणि प्रताप सिंग अशी मुले होती. बघेलीन राणीने राजपाल देव च्या मरणानंतर वैध दावेदार दलपत देव ला बाजूला सारून स्वताच्या भावाला राजगादीवर बसविले. दलपत देवने काही कालावधीनंतर बस्तरमधील लोकांचा विश्वास संपादित करून त्त्यांच्या सहकार्याने बस्तारची राजगादी मिळवली. दलपत देवला सात राण्या होत्या. मोठी राणीच्या मुलाचे नाव अजमेरसिंह होते. दलपत देवने राजधानी जगदलपूरला हलविली. बस्तर राज्याची राजधानी जगदलपूर झाली. दलपत देवचे राज्य सन १७३१ ते १७७४ पर्यंत होते. दलपत देव च्या मरणानंतर अजमेरसिंह राजगादीवर आला. परंतु दोन वर्षातच दुसऱ्या राणीचा दर्या देवने राजगादीवर कब्जा केला. दर्या देवने जयपूर व नागपूर राजाच्या मदतीने अजमेरसिंह ला राजगादीवऋण काढले. या मदतीसाठी दर्या देवने नागपूरच्या राजाला वार्षिक खंडणी देण्याचे मान्य केले. राजा दर्या देवचे शासन सन १७७७ ते १८१९ पर्यंत होते. नंतर इंग्रजांनी ताबा मिळवला.

बस्तर राज्याबाध्ये हलबा क्रांती मोडून काढण्यासाठी मराठा राजाने नाग गोसाई ची मदत घेतली, त्या मोबदल्यात नाग गोसाई च्या सरदारास रायपूर येथे जमिनदारी दिली. हलबाचा विद्रोह मोडून काढण्यासाठी इंग्रजांची, जयपूर व नागपूरच्या राजाची मदत घेतली. दर्या देवचे सैनिकही शामिल होते. या चार राजांच्या सैनिकांनी हलबा क्रांती मोडून काढली. विद्रोही हल्बांना इरावती नदीवरील ९० फूट उंच चित्रकुट धबधब्यावरून खोल भागात फेकण्यात आले. त्यापैकी एक वाचला बस्तरच्या दर्या देव राजाने डोंगर येथील हलबा क्रांती इतरांच्या मदतीने मोडून काढल्यानंतर हल्बांचे डोळे सुदधा काढण्यात आले. सन १७७९ च्या पराभवानंतर बस्तरची कुलदैवत माय दंतेश्वरी समक्ष हल्बांना शपथ घ्यावी लागली. या हलबा क्रांतीनंतर काही हलबा सैनिकांनी पश्चिमेकडे स्तलांतरित होवून चंद्रपूरच्या गोंड राजाची नोकरी स्वीकारली. त्यांचे काही वंशज भंडाऱ्यात आहे. हलबा क्रांतीचे परिणामामुळे त्यांचे मराठा प्रदेशात विदर्भामध्ये स्थलांतर झाले. हलबा आदिवासी स्वताची उत्पत्ती विसरलेत. त्यांनी विनकरीचा (मराठी भाषेत कोष्टीचा) व्यवसाय स्वीकारला. हलबा आदिवासी विदर्भात असलेले हिंदू मधील कोष्टी या जातीशी मिसळलेत.

प्राचीन बस्तर व कांकेर सध्याचे ओरिसा व छत्तीसगढच्या सीमेवरील राज्याचे हलबा आदिवासी प्रभावशाली नागरिक होते. बस्तर राज्य पूर्णता स्वतंत्र राज्य होते. दलपत देवला बस्तरच्या नागरिकांनी राजगादीवर बसवले. हल्बांनी वैध वारस म्हणून अजमेरसिंहच्या समर्थन मध्ये दर्या देव विरुद्ध विद्रोह केले आणि अजमेरसिंहला राजगादी मिळवून दिली.हलबा सैनिकामुळे बस्तर राज्यावर दुसऱ्या राज्याने लढाई केली नाही पण हलबा आदिवासींचे युद्ध अत्यंत प्रशिक्षित आणि अपार सैन्य क्षमता असलेल्या मराठा, इंग्रज, गोसाई आणि जयपूर या चार राज्यांच्या सैनिकांशी झाले. यात हल्बांचा पराभव झाला. दर्या देव राजाने हल्बांचा पराभवानंतर हजारो हल्बांची कत्तल केली, डोळे फोडले. ह्ल्बांनी आदिवासींची कुलदैवत माय दंतेश्वरी समोर शपथ घेतल्यानंतर दर्या देव विरुद्ध पुन्हा युद्ध करणे शक्य नव्हते म्हणूल पराजित झालेल्या हल्बांनी बस्तरमधून स्थलंतर केले. आणि भंडारा, चांदा , दुर्ग, रायपूर इत्यादी भागात स्थलांतरन झाले. हलबा आदिवासींची तीन प्रादेशिक गात पडले. बस्तर मध्ये राहणारे बस्तरीया हलबा, छत्तीसगढ म्स्ध्ये राहणारे छत्तीसगढ हलबा तर मराठा प्रदेशात राहणारे मराठिया हलबा. मराठिया हल्बांनी कामाच्यात आणि व्यवसाच्या शोधात चांद, भंडारा मार्गाने नागपूर प्रदेशात स्थायिक झाले. हिंदूंच्या संपर्कात येवून हिंदू धर्म व मराठी भाषा स्वीकारली. त्यांनी उदरनिर्वाहासाठी हिंदू मधील कोष्टी जातीचा व्यवसाय स्वीकारला. बस्तर मधील हलबा स्तलांतरित झाल्याने आपली मूळ उत्पत्ती विसरलेत आणि कोष्टी धंद्यामुळे स्वताला कोष्टी म्हणून घेवू लागले. मराठिया हल्बांनी इतिहास विसरण्या साठीच बस्तर सोडले. हलबा आदिवासी व्यवसायाने कोष्टी झाले तरी प्राचीन बोलीभाषा व मातृभाषा म्हणून समाजामध्ये संपर्कसाठी हलबी भाषेचा वापर सुरु ठेवला. हल्बांचे आदिवासित्व आजही या भाषेमुळे जीवंत दिसतो. भाषा शास्त्रज्ञ जी. ए. ग्रीयर्सन यांनी सन १९०५ च्या लांग्वेस्तिक सर्वे ऑफ इंडिया या पुस्तकात कोष्टी (विणकर) व्यवसाय करणारे हलबा आदिवासी कशी भाषा त्या वेळी बोलायचे याचा नमुना म्हणजे विदर्भात कोष्टी या धंद्यात असलेल्यांची मातृभाषा हलबी होय. हलब आदिवासींनी बस्तर सोडले, इतिहास विसरले, हिंदू धर्मीय आणि मराठी भाषिक झाले तरी हलबा आदिवासींची मिळ संस्कृती , चालीरीती, मातृभाषा इत्यादी वैशिष्टे आजच्या आधुनिक काळातही काही प्रमाणात आढळतात. हलबा आदिवासी हे स्वतंत्राचे, लोकशाहीचे व नैतीकतेचे उपासक आहेत. क्रांतिकारी हलबा आदिवासींमध्ये राजसत्ता उलटून टाकण्याची अफाट शक्ती दिसते, ती आजही कायम आहे.

हलबा आदिवासी यांचा प्राचीन इतिहास आहे. ते हलबा कोष्टी कधीच नव्हते आणि नाहीत. हलबा कोष्टी म्हणून इतिहास मध्ये आदिवासी नाहीत. हलबा कोष्टींचा प्राचीन इतिहास नाही. हल्बांना हलबा कोष्टी संबोधून त्यांना भारतीय संविधानाच्या अधिकार व हक्कांपासून स्वार्थासाठी विरोधक वंचित करीत आहेत. हलबा आदिवासींमध्ये अद्यानी असलेले स्वताला हलबा कोष्टी म्हणवून शासनापुढे बोगस असल्याचे छातीठोकपणे सांगत फिरत आहे, हे दुर्दैव्य आहे.