अ‍ॅड. नंदा पराते

प्रारंभी आदिम संविधान संरक्षण समितीच्या मार्गदर्शिका आणि आदिम पार्टीच्या राष्ट्रिय अध्यक्षा असा प्रवास करीत अ‍ॅड. नंदा पराते यांनी नागपूर च्या समाजकारणात आणि राजकारणात चांगलाच जम बसविला आहे. एखाद्या नव्या पार्टीचे ९ नगरसेवक आणणे हि बाब राजकीय दिग्गजांना तोंडात बोटे घालण्यास भाग पडणारी आहे.

प्रथम समाजकारण आणि दुय्यम राजकारण हि भूमिका, महागड्या शिक्षण पद्धतीवर अंकुश, जाती दाखल्यांसाठी पराते यांचे मार्गदर्शन, रोजगाराच्या, नोकरीच्या जादा संधी, वाढत्या महागाईला आणि भ्रष्ट्राचारला आळा , नागरी सोईच्या दर्जात सुधारणा, सामान्य माणसाला न्याय, सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी कमी दारात उपचारांच्या सोईंना प्राधान्य यासाठी जनतेचा लढा लढणाऱ्या, देशाला संविधान (घटना) मिळाले. परंतु घटनाकाराला अभिप्रेत असलेला न्याय समाजाला मिळत नाही म्हणून व्यथित झालेल्या, न्यायाचा मार्ग संविधानाच्या सन्मानातूनच जातो असा समज असलेल्या, या सन्मानासाठी संघर्ष करणाऱ्या आदिम पार्टीच्या राष्ट्रिय अध्यक्षा अ‍ॅड. नंदा पराते यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.

अ‍ॅड. नंदा पराते यांच्या राजकारणाची प्रेरणा त्यांचे पती उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते आहेत. त्यांना कायद्याचा प्रचंड अभ्यास आहे. जातीव्यवस्थेवरचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. या देशातील सर्व लोकांना २४ तासांच्या आत जती दाखला मिळावा, असे त्यांचे म्हणणे आहे. केवळ एका जुन्या कागदि पुराव्यासाठी त्यांचे आयुष्य बरबाद होते. परंतु सध्याच्या व्यवस्थेपुढे सारेच हतबल झाले आहेत. यामुळे भ्रष्टाचारालाही बाब मिळत आहे. हे सारे बदलावयाचे असेल तर सर्वांनी एकजुटीने लढले पाहिजे, असा विचार करून त्यांनी जनजागृतीचे कार्य सुरु केले.याच निमित्ताने सामाजिक, सांकृतिक कार्यक्रम होवू लागले. लोकांचा संपर्क वाढत गेला. या जनसंपर्काच्या निमित्ताने अनेक सामाजिक कामे घडतात. गावोगावी आमचे संपर्क अभियान सुरु आहे. एकट्या नागपुरात अनेक सभा झाल्यात. या सभांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. आदींमच्या आंदोलनाच्या निमित्ताने का होईना, परिवर्तनाचा बिगुल वाजला आहे.

महाराष्ट्राच्या प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी चंद्रभान पराते यांची उच्चशिक्षित पत्नी अ‍ॅड. नंदा पराते यांचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. कोणत्याही अधिकारी अथवा राजकीय नेत्याच्या पत्नीने सामाजिक न्यायासाठी त्याग व बलिदान केले असा इतिहास नाही. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा म्हणून त्याग व बलिदानाच्या भावनेने अ‍ॅड. नंदा पराते कार्य करीत आहे. सर्वसामान्य लोकांसाठी संघर्ष केल्यामुळे अनेक फौझादारी गुन्हे त्यांचावर दाखल झाले आहेत. अ‍ॅड. नंदा पराते यांच्यावर उमरेड प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा झाली होती. ते आणि ७०-८० लोक उमरेडच्या अधिकारीला जाती दाखला मागायला गेले होते. जातीचा दाखला तर नाही मिळाला परंतु १५ दिवसाचा कारावास त्यांचा नशिबी आला. आपल्या मतांवर निवडून येणारा कोणताही नेता लोकांना न्याय मिळावा म्हणून तुरुंगात गेला नाही पण स्वताच्या स्वार्थासाठी घोटाळ्यात अडकून तुरुंगात गेले. सर्वसामान्यांना न्याय मिळावा, त्यांना त्यांचे अधिकार मिळावे म्हणून अ‍ॅड. नंदा पराते उमरेडच्या बहुचर्चित संघर्षात १५ दिवस सेंट्रल जेल मध्ये राहिल्यात.

कधी काळी ‘त्यांची’ केवळ गृहिणी म्हणून ओळख होती. पतीपासून प्रेरणा घेवून त्यांनी समाजकार्यात उडी घेतली. कायद्याच शिक्षण पूर्ण केल्यामुळे कायदा त्यांना माहित होता. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी सामाजिक न्यायासाठी आंदोलनाला सुरवात केली. जनतेचा प्रतिसाद हळूहळू वाढू लागला. सुरवातीला केवळ हलबा समाजासाठीच त्यांचा संघर्ष आहे, असा ‘प्रोपोगंडा’ त्यांच्या हितशत्रूने केला. मात्र नंतर सामान्य नागरिकांना त्यांची प्रामाणिक भूमिका कळू लागली. केवळ हलबा आदिवासीच नव्हे तर दलित, मुस्लीम, ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी असलेला त्यांचा व्यापक दृष्टीकोन लोकांच्या लक्षात आला. आज त्यांच्या आंदोलनात केवळ हलबा बांधवच नाही तर सर्वच समाजातील नागरिकांचा सहभाग आहे.