आदिम पार्टी

आदिम च्या माध्यमातून अनेक आंदोलने व समाज जागृती झाली. आदिम ने हलबा आदिवासी समाज ला खरी दिशा व विचार दिल्यामुळे लोकशाही मार्गाने एकता निर्माण झाली. ह्याचे सर्व श्रेय आदिम च्या कार्यकर्तांना जाते. आदिम चे ध्येय व उद्दिष्ट हलबा समाज ला माहीत आहे. आदिम मागील आठ वर्षापासून हलबा समाजाच्या न्यायासाठीच धरणे आंदोलन करीत आहे. आदिम ची शाखा वार्ड व गांवा-गांवात आहेत. आदिम चे नेतृत्व अँड.नंदाताई पराते करतात आणि त्या वकील आहेत.

आदिम च्या राष्ट्रीय अध्यक्ष अँड.नंदाताई पराते यांचे नेतृत्व हलबा समाजात व विदर्भात निर्माण झाले, त्यांनी हलबा समाजाच्या न्यायासाठीच व स्वतंत्र विदर्भासाठी अनेक संघर्ष करीत असल्याची दखल वर्तमान पत्राने घेवून बातम्या आल्यात. हलबा समाजासाठी आंदोलन करून संघर्ष केल्यामुळे अनेक गुन्हे पोलीस स्टेशन मध्ये दाखल होऊन हलबा समाजाच्या नेत्या अँड.नंदाताई पराते व 100 च्या वर कार्यकर्तांना अटक झालेल्या आहेत. उमरेडच्या हलबा जाती दाखला आंदोलनात 17 दिवस अँड.नंदाताई पराते व शकडो कार्यकर्ते नागपुर सेंट्रल जेल मध्ये राहीले. आदिम ने विदर्भात दौर करून अँड.नंदाताई पराते यांनी हलबा समाजात अन्यायाविरूध्द जनजागृती केली. हलबा समाज एकजुट केला. हलबा समाजाच्या न्यायासाठी होणार्या आदिम च्या प्रत्येक आंदोलनात कर्मचारी, युवक व महिला यांचा प्रचंड सहभाग असतोच. आदिम च्या अध्यक्ष व अन्यायाविरूध्दच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारी अँड. नंदाताई पराते यांचे हलबा समाजासाठी असलेले त्याग व बलिदान प्रत्येक हलबा बांधवांना माहीत आहे म्हणूनच आदिम वर विश्वास आहे.

आदिम ची संघटन शक्ती आहे, आदिम चे नेतृत्व खंबीर व अभ्यासू असल्याने हजारों कार्यकर्ते आहेत. आदिम च्या एका आवाजाने शकडो कार्यकर्ते एकत्र येतात. हलबांच्या न्यायासाठी आदिम चे नेतृत्व करणारी अँड.नंदाताई पराते यांनी नवी दिशा व नवा विचार दिल्यामुळे हलबा समाजामध्ये एकता निर्माण झाली आहे. आदिम च्या आंदोलनासाठी आदिमचे कार्यकर्ते देणगी वा वर्गणी जमा करीत नाही, हे संपूर्ण हलबा समाजाला माहीत आहे म्हणूनच आदिम च्या निःस्वार्थ कार्यास हलबा समाजाची साथ आहे.

भारतीय संविधान निर्माते डा बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला महाराष्ट्रात संविधानातून अनुसूचित जमाती म्हणून अधिकार व हक्क दिलेत. राज्य शासनाने ४५ जमाती पैकी केवळ १२ जमातीचे आदिवासी आमदारांचा राजकीय दबावातून ३३ जमातीच्या समाजावर अन्याय केला आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमाती यादीतील ४५ जमाती पैकी केवळ १२ जमाती खरे, ३३ जमाती खोटे हा प्रकार संविधान विरोधी आहे. या अन्यायग्रस्त ३३ जमातीच्या मतदानावर महाराष्ट्रात १०० आमदार निवडून येतात. ४०-५० वर्षाचा प्रश्न असला तरी त्यावर हाच लोकशाहीत उपाय आहे. समाज हिताची योग्य दिशा व विचार देणारे नेतृत्व पाहिजे तरच प्रश्न सुटतील. आदिमच्या पिवळ्या झेंड्याखाली समाजाची एकता दाखवा. हलबा आदिवासींनी गावा -गावात, मोहल्ला – मोहल्यात आणि वार्डा – वार्डात लोकशाही मार्गाने निवडणूकीच्या माध्यमातून आपली राजकीय शक्ती सर्व राजकीय पक्षांना दाखवावीच लागेल.